महिला आणि महिला

शेजारची काकू आमच्याकडे आली आणि आईशी गप्पा मारू लागली. मी तिथेच असल्याने मग मीही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झालो. गप्पा चांगल्याच रंगल्या. मी आणि आई पलंगावर बसलो होतो, तर काकू उभीच होती. मी काकूला म्हणालो, “काकू बस ना तू पण. अशी उभी का आहेस?” तर काकू म्हणते, “मी कशी बसणार ताईंसमोर? आणि आईपण (माझी आजी) घरात आहेत.”

मी म्हणालो, “काकू, आता जमाना बदललाय. चालतं सगळं आता.” पण तरीही ती काही बसली नाही. म्हणाली, “बरोबर नाही ते. असं काही केलं, की बायका मग मागून टीका करतात.”

मग आई मला उद्देशून म्हणाली, “तुझी बायको तर काय, खुर्चीवरही बसेल ना?” आईला मला अशा बाबतींमध्ये डिवचण्याची फार हौस. मी म्हणालो, “अर्थातच! ते काय सांगायला पाहिजे? आता पूर्वीसारखं नाही राहिलं. शहरात जाऊन बघ. बायका नवऱ्यालाही नावाने हाक मारतात.” तर आई म्हणते, “ते इथे चालणार नाही. ते सगळं शहरात.”

जर आपण आज समाजाचा विचार केला, तर महिलांना दुय्यम वागणूक मिळण्यामागे प्रामुख्याने महिलाच आहेत. आपल्या आयाच आपल्या मुलींना पवित्र भारतीय नारी, नम्र भारतीय नारी, सोशिक भारतीय नारी यांचे धडे देत असतात. आणि जर एखादी स्त्री चाकोरीबाहेर वागत असेल, तर तिला फटकारणाऱ्या, टीका करणाऱ्याही महिलाच असतात.

आता यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा. त्यांनाही त्यांच्या आधीच्या पिढीकडून अशीच शिकवण मिळालेली असते. पण, हे बदलायचं असेल तर त्यांना दाखवून द्यायला हवं, की त्यांच्या अशा वागण्यानं त्यांचंच किती नुकसान होतंय ते. जर आपल्या समाजात महिलांना खुर्ची, पलंगावर बसण्याचा साधा हक्क मिळत नसेल, तर त्याहून लाजिरवाणी गोष्ट नाही.

Advertisements

2 thoughts on “महिला आणि महिला

 1. ho nakkich
  eka bai chi sarvaat mothi dushman ek baich aste..
  nemi tila velichi upma detat..
  satat purushacha adhar ghyayla lavtat…
  barach ahe..
  essay lihun hoil…

Leave a Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s